Ad Code

स्कूल बस मालकांना वार्षिक‍ करामध्ये सुट ; वाहनाचे नूतनीकरण करुन घेण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

अहमदनगर  :  कोविड विषाणूमुळे उदभवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे २८ जानेवारी २०२२ च्या शासन अधिससुचने अन्वये वार्षिक कर भरणाऱ्या स्कूल बसेसना १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च  २०२३ या कालावधीसाठी करामध्ये शंभर टक्के सुट देण्यात आली आहे.
स्कूल बसेस वाहन मालकांना योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी प्रत्येक शनिवारी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन विशेष कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.संबधितांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu