Ad Code

मराठा आरक्षण प्रश्नी राजकीय नेत्यांच्या भरवशावर राहिल्याने समाजाचा घात - 'शिवा' संघटनेच्या प्रा.धोंडेंचा आरोप

औरंगाबाद  :  संघटनेच्या कायदेशीर रेट्यामुळेच वाणी समाजासह इतर लिंगायत जातींना ओबीसी आरक्षण मिळाले.मात्र ९० ते ९५ टक्के आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या व गावापासुन राज्यापर्यंत बहुतांश ठिकाणी सत्तेत असलेल्या मराठा समाजाचे आरक्षणाबाबतीत मोठे नुकसान झाले असुन आरक्षण प्रश्नी राजकीय नेत्यांच्या भरवशावर राहिल्यानेच समाजाचा घात झाला असल्याचा आरोप अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे (शिवा) संस्थापक प्रा.मनोहर धोंडे यांनी केला.
 'शिवा' संघटनेच्या बोधेगाव (ता.शेवगाव,जि. अ.नगर ) येथील शाखेचे उदघाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.


अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या शाखा उदघाटन समारंभ प्रसंगी बोधेगाव येथे आयोजित कार्यक्रमात प्रा.धोंडे बोलत होते.यावेळी मानुर संस्थानचे गुरू शिवाचार्य महाराज मानुरकर,'शिवा'संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे,औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा.नंदकिशोर गायकवाड,भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे,उपाध्यक्ष सुनील वाडकर,शिवकुमार डोंगरे,साहिल काझी,तुषार वैद्य,प्रकाश भोसले,भाऊराव भोंगळे,राम अंधारे,विष्णू वारकड,महेंद्र भाडाईत,अशोक बसापुरे,पुणे जिल्हाध्यक्ष प्रशांत हस्ते,श्रावण जंगम,प्रा.काटे सर,प्रा.बोंगाणे सर,मयुर हुंडेकरी,अँड.कार्तिक कमाने,दीपक तागडे आदीसह विविध पक्षांचे पदाधिकारी,वाणी समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडिताराध्य शिवाचार्य महाराज वडांगळीकर हे होते.

पुढे बोलताना प्रा.धोंडे म्हणाले की,वीरशैव ही एक जात नाही तर संस्कृती आहे.जो हृदयावर शिवलिंग धारण करतो,कपाळावर विभुती लावून भगवान शिवाची पुजा करतो तो वीरशैव.सर्व बहुजन समाज भगवान शिवाचे भक्त असल्याने ते वीरशैवच आहेत.त्यांमुळे राजकीयदृष्ट्या कोणी कुठेही राहिले तरी समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी 'शिवा'संघटनेच्या छताखाली एकत्रित येणं आवश्यक आहे.आपल्या सर्वांची जाती-जातीमध्ये विभागणी करण्याचे काम मनुवाद्यांनी केले.व्यवसायावरून जातीच्या भिंती उभ्या केल्या.समाजात भेदाभेद निर्माण केलेल्या जाती-उपजाती भिंती गाडल्या पाहिजेत यासाठीच 'शिवा' संघटनेची स्थापना झालेली असुन सध्या देशातील सहा राज्यात व दोन देशात मिळुन पाच हजारांवर शाखा कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्व सामान्यांना सुखदुःखात साथ देणारे,पदाचा उपयोग समाजासाठी करणारे नेतृत्व म्हणुन गौरव करत कायद्याच्या कचोटीत लिंगायत वाणीसह विविध जातींना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात प्रा.धोंडे यांचा सिंहाचा वाटा गौरवोद्गार प्रा.नंदकिशोर गायकवाड यांनी काढले.
यावेळी शिवाचार्य महाराज मानुरकर,पंडिताराध्य वडांगळीकर महाराज,भाजपचे जिल्हाध्यक्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेटे,प्रा.गायकवाड यांचे मनोगते झाली.


कार्यक्रमास बोधेगावमधील सदाशिव कानडे,बापूसाहेब मानुरकर,सुरेशमामा डोंगरे,बाळासाहेब हुंडेकरी,शिवनाथ बोराटे,रामेश्वर तोडकरी यांचेसह बोधेगाव परिसरातील विविध जिल्ह्यातील संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावातील वीरशैव समाज बांधवांची परिवारासह असलेली उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.राम भांगरे यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu