Ad Code

शेवगाव-पाथर्डी व कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांचा पाणीपुरवठा मंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि.२५ : शेवगाव-पाथर्डी आणि कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा घेत प्रस्तावित योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकी वेळी आमदार श्रीमती मोनिका राजळे,आमदार रोहित पवार यांचेसह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,अधीक्षक अभियंता सुनंदा नरवडे,जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय मुळे, कार्यकारी अभियंता आनंद रुपनर आदी  संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले,पाण्याचे दुर्भिक्ष्य विचारात घेता भगवानगड परिसरातील ४६ गावांसाठी नवीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित असुन या योजनेला मंजुरी देण्याबाबत शासन सकारात्मक आहे.हातगाव व इतर २८ गावांसाठीच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत केवळ पाच गावांनीच योजनेच्या सुधारणात्मक पुनर्जोडणीसाठी सहभागी होण्यास सहमती दर्शवली असून उर्वरीत २४ गावांना या योजनेत समाविष्ट करून घेण्यासाठी आमदार श्रीमती राजळे यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर बैठक आयोजित करण्याचे निर्देश मंत्री मंत्री पाटील यांनी दिले.

पाथर्डी तालुक्यातील भगवानगड परिसरातील ४६ गावांसाठी  प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्राधान्याने  मंजूर करण्याची  कार्यवाही  लवकरच करण्यात येणार आहे.मिरी-तिसगाव व इतर ३३ गावे, बोधेगाव व इतर ७ गावे, अमरापुर - माळी बाभुळगाव व इतर ४९ गावे आणि शहर टाकळी व इतर २४ गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबवण्याबाबत प्रशासकीय  मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या कर्जत व जामखेडमधील सर्व गावांसाठी लवकरच योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन कार्यारंभ आदेश देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी मंत्री पाटील यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu