Ad Code

भगवानगड पालखी मार्गाचे काम आठ दिवसात चालू करण्याचे मंत्री मुंडेंचे आश्वासन योगेश खेडकरांची माहिती

शेवगाव  :  शेवगाव तालुक्यातील राणेगाव ते भगवानगड या पालखी मार्गाचे काम येत्या आठ दिवसात चालू करण्याचे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्याची माहिती सरस्वती बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष योगेश खेडकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

या बाबत अधिक माहिती देताना 'सरस्वती'संस्थेचे अध्यक्ष खेडकर म्हणाले की,सध्या या मार्गाची मोठी दुरवस्था झाल्याने शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन सदर मार्गाचे काम पुर्ण करण्यात येणार आहे.मंत्री धनंजय मुंडे यांची नुकतीच परळी येथे भेट घेऊन भगवानगड ते राणेगाव या मार्गाची सद्यस्थिती त्यांच्या निदर्शनास आणुन दिली आहे. सन १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत रोजगार हमी योजनेमधुन या मार्गाचे काम करण्यात आले होते.त्या नंतर या मार्गासाठी निधी उपलब्ध न झाल्याने हा मार्ग पुर्ण बंद पडला होता.ना.मुंडे यांना पंचक्रोशीतील राणेगाव,नागलवाड़ी,सेवानगर तांडा ग्रामपंचायतच्या वतीने मासिक सभेने या रस्त्याबाबत घेतलेल्या ठरावासह निवेदन दिले.
यावेळी राणेगावचे सरपंच शहादेव खेडकर,उपसरपंच शरद वाघ,उद्धव वाघ,सचिन वाघ,पांडुरंग वाघ,श्रीकृष्ण खेडकर,श्रीकिसन पालवे,पुंजाहरी वाघ,नागेश वाघ,अण्णासाहेब वाघ,डॉ.विनायक दहिफळे,अरुण आंधळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu