Ad Code

विविध उपक्रमांनी स्व. निर्मलाताई काकडे यांचा ३५ वा पुण्यस्मरण साजरा

शेवगाव  :  विविध उपक्रमांनी स्व.निर्मलाताई काकडे यांचा ३५ वा पुण्यस्मरण दिन बोधेगाव येथील कर्मगोगी आबासाहेब काकडे फार्मसी शैक्षणिक संकुलात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदयुम्न इगे होते.व्यासपीठावर प्रा. स्मिता नाईक,प्रा. समता काटे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

प्रा.नाईक यांनी आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मुलींनी मोबाईलचा वापर कसा करावा,आपले राहणीमान व वर्तुणूक कशी असावी.? याबाद्दल मार्गदर्शन केले. प्रा.काटे यांनी महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण याविषयी विचार व्यक्त केले. काकडे डी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.राजेश मोकाटे यांनी स्व.निर्मलाताई काकडे यांचा जीवनपट सादर केला.

महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला.डी फार्मसी महाविद्यालयातुन सोमेश्वर मोटकर प्रथम क्रमांक,द्वितीय क्रमांक विश्वांभर राऊत याने तर तृतीय क्रमांक सिद्धांत गवारे व प्रतिक्षा हुंबे यांनी मिळवला.चित्र रेखाटन स्पर्धेमध्ये स्नेहा वखरे हिने प्रथम,किरण आगरकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला.महिला सक्षमीकरण या विषयावर बी.फार्मसी महाविद्यालयातुन शरयु भोसले हिने प्रथम, साक्षी पडोळे हिने द्वितीय तर सिद्धेश्वर नवथर याने तृतीय क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.तेजस्विनी साळुंके यांनी तर आभार प्रा.पल्लवी तोडकरी यांनी मानले.कार्यक्रमाचे समन्वयक म्हणुन  प्रा.प्राजक्ता भस्मे यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu