Ad Code

जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका मनसे पूर्ण ताकतीने लढविणार जिल्हाध्यक्ष खेडकर

शेवगाव  :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व उमेदवारांना पक्षाच्या वतीने पुर्ण ताकद देऊन आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणूका मनसे पूर्ण ताकतीने लढविणार जाईल असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी जाहीर केले.

जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांची महत्वपूर्ण बैठक पक्ष निरिक्षक तथा जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर,सचिन डफळ,बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.मनसेचे अध्यक्ष श्री.राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व मनसेचे नेते माजी गृहराज्यमंत्री श्री.बाळा नांदगांवकर यांच्या सुचनेनुसार हे तीनही जिल्हाध्यक्ष जिल्हा दौऱ्यावर असुन जिल्ह्याच्या विविध भागात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.येत्या १३ मार्च रोजी बाळा नांदगांवकर हे अहमदनगर येथे मेळावा घेणार आहे. या मेळाव्याच्या व निवडणूकांची पूर्व तयारीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मनसेचे जिल्हाअध्यक्ष देविदास खेडकर,सचिन डफळ,बाबासाहेब शिंदे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हाध्यक्ष खेडकर बोलत होते.यावेळी पदाधिकारी व उमेदवारांना येणा-या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या.

याप्रंसगी मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे,डाॅ.संजय नवथर,उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत,सरपंच दिलीप सुपारे,उपतालुकाध्यक्ष रामेश्वर बलिया,देविदास हुशार, शहर सचिव मंगेश लोंढे,विभागाध्यक्ष सुनिल काथवटे,उपाध्यक्ष संदीप देशमुख,बाळा वाघ,ग्रामपंचायत सदस्य गोरख कौंसे,अमिन सय्यद,अविनाश बुटे,नवनाथ भागवत,मच्छींद्र तुजारे यांच्यासह पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu