Ad Code

प्रत्येक 'स्त्री'चा सन्मान व्हायलाच हवा - माजी जिल्हा परिषद सदस्या काकडे

शेवगाव  :  सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असून पुरुषांच्या खांद्याला खांदा देवून यशस्वीपणे लढत आहेत,त्यामुळे प्रत्येक 'स्त्री'चा सन्मान हा व्हायलाच हवा असे मत माजी जि. प. सदस्या अंजली काकडे यांनी केले.

बोधेगाव (ता.शेवगाव) येथील ब्राइट फ्युचर कॉलेज,आरोही माध्यमिक विद्यालय व सनराईज पब्लिक स्कूल येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी जि. प सदस्या काकडे बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लतादेवी (माई) काकडे होत्या.
पुढे बोलताना काकडे म्हणाल्या की,माता जिजाऊंनी आपणास संस्कार शिकवले,सावित्रींनी शिक्षणाचं महत्व सांगितलं,अहिल्याबाई होळकरांनी लढावं कसं हे आपणास शिकवलं.संपूर्ण स्रियांना जगण्याची प्रेरणा दिली.त्यांच्या कर्तृत्वाची आठवण व जाणीव राहावी यासाठी अशा कार्यक्रमाची फार आवश्यकता आहे. आशासेविका सीमा घुगे म्हणाल्या,आज स्रियांसाठी फक्त चूल आणि मूल ही पद्धत बंद झालेली आहे.तरी देखील स्रियांना स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे.खूप वेदना,अपमान येतो तरीही स्रिया सहनशील राहून पुरुषांच्या बरोबरीने आज आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. अमृता वाल्हेकर,आर्यन गर्जे,सहेर शेख,आरोही गर्जे,अन्वी कुलकर्णी,आर्या केसभट,सुप्रिया थोरात या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई,जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई यांची वेशभूषा परिधान करून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महिला दिनानिमित्त संत नागेबाबा पतसंस्थेचे बोधेगाव शाखाधिकारी मदन अंतरकर,संदीप वंजारी यांनी सर्व महिला शिक्षिका व कर्मचारी यांचा पुस्तके भेट देवून सन्मान केला. या कार्यक्रमाला डॉ.गौरी कुलकर्णी,अंजली बोडखे,प्रणाली केसभट,गोदाताई गर्जे  यांचेसह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका प्रतिभा गर्जे यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल राठोड यांनी तर आभार योगेश्वरी वाघमारे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu