Ad Code

संगमनेर उपविभाग महसुल वसूली मध्ये जिल्ह्यात अव्वल ; उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल जमा

शिर्डी  /  उमाका वृत्तसेवा  :  जमीन व गौण खनिज महसुल यांतुन मार्च २०२२ अखेर संगमनेर महसुल विभागासाठी १०० टक्के महसुल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.संगमनेर उप विभागाने प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात महसुली वसूलीत अव्वल क्रमांक पटकाविला आहे तर कर्जत नंतर संगमनेर तालुकाजिल्ह्यात दुसऱ्या स्थानी आहे.संगमनेर तालुक्यातील महससुल यंत्रणेने कष्ट घेत आज अखेर सुमारे २४ कोटी ५२ लाख २४ हजार रुपयांची वसूली केली. महसुल उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली करत १२६.८० टक्के महसुल उद्दिष्ट तालुक्याने साध्य केले आहे अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली आहे.

महसुल विभागाच्या अंतर्गत जमीन महसुल , अनधिकृत अकृषक कर , नजराणा प्रकरणे , मोबाईल टॉवर , इतर कर तसेच गौण खनिज परवाने , शासकीय यंत्रणा स्वामित्व धन , अनधिकृत गौण खनिज या माध्यमातुन संगमनेर महसुलसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १०० टक्के जमीन महसुलीचे उद्दिष्टे देण्यात आले होते. यात जमीन महसुल पोटी १० कोटी १२ लाख ८३ हजार तर गौण खनिज पोटी १४ कोटी ३९ लाख ४१ हजारांचा महसूल जमा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन , प्रांतधिकारी शशिकांत मंगरूळे यांचे वस्तुनिष्ठ नियोजन व मार्गदर्शन यामुळे हा जमीन महसुल जमा करण्यास संगमनेर तहसील विभागाला यश आले असेही तहसीलदार निकम यांनी सांगितले आहे.
कोविड परिस्थिती असुनही जमीन महसुल , नजराणा प्रकरण , मोजणी , कुळ कायदा प्रकरण , बिनशेती , शर्तभग , अनाधिकृत एनए , तुकडा नियमाकुल , शासकीय कामे रॉयल्टी , गौण खनिज दंड , वाहतुक कारवाई या माध्यमातून २४ कोटी ५२ लाख २४ हजार रूपयांची वसुली करत १२६.८० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.
निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर , महसूल नायब तहसीलदार उमाकांत कडनोर , प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे , तालुक्यातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी यांनी अथक प्रयत्न , मेहनतीने वसुली पूर्ण केली. या महसुल वसुलीबद्दल तहसीलदार निकम यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu