Ad Code

जोहरापुरच्या ऊस तोडी अभावी शेतकरी आत्महत्या प्रकरणी कारखाना प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - शेवगाव मनसेची मागणी

शेवगाव  :  उसाला वेळीच तोड मिळाली नाही म्हणून शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथील शेतकरी कै.जनार्दन माने यांनी यांनी शेतातील उभा ऊस पेटवून देत स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी कारणीभुत असलेल्या कारखाना प्रशासना विरोधात तातडीने सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच कारखान्याच्या वतीने पिडीत कुंटुबियांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे.

आज जोहरापूर येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी कै.जनार्दन माने यांच्या निवासस्थानी जाऊन मनसेच्या प्रमुख पदाधिका-यांनी भेट देत परिस्थितीची माहिती घेतली.तालुक्यातील अनेक साखर कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून स्थानिक शेतक-यांवर मात्र अन्याय करत आहेत.स्थानिक शेतक-यांना आपल्या ऊसाच्या तोडी साठी टोळ्या दिल्या जात नाहीत.या राजरोस सुरू असलेल्या अन्यायाच्या विवंचनेतुनच माने यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला आहे.या सर्व बाबीस सर्वस्वी कारखाना प्रशासन जबाबदार असून कारखाना प्रशासनाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे अशी मागणी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे.

दरम्यान,येत्या तीन चार दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ साखर आयुक्ताची भेट घेऊन सदर कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी करणार असल्याचे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत यांनी सांगितले. यावेळी मनसेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे,जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ भागवत,तालुका उपाध्यक्ष संजय वणवे,सोमनाथ आधाट,विकास भागवत,गणेश डोमकावळे,नवनाथ भागवत,रामेश्वर बलिया,ज्ञानेश्वर कुसळकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब फंटागरे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu