Ad Code

शिंगोरी येथे आजपासुन भगवानगडाचा ८८ वा नारळी सप्ताह


राज्यातील नामवंत किर्तनकारांची हजेरी : भविकांनी लाभ घेण्याचे ग्रामस्थांचे आवाहन

शेवगाव  :  राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान गडाचे संस्थापक संत भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास आज (गुरुवार) पासुन शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे गडाचे मठाधिपती डॉ.नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होत आहे.सप्ताहाचे यंदा ८८ वे वर्ष आहे.
संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहास आज गुरुवार १४ एप्रिल २०२२ पासुन प्रारंभ होत असुन कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासुन बंद असलेला हा सप्ताह प्रथमच शिंगोरी येथे मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी १० वाजता संत भगवानबाबा यांचे प्रतिमेवर पुष्पवृष्टी करून सप्ताहाची होणार आहे.

सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे दररोज रात्री ९ ते ११ या वेळेत कीर्तन होणार आणि सायंकाळी ५ ते ७ वाजता 'ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण' गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ.नामदेव महाराज यांचे होणार आहे. गुरुवार(१४ एप्रिल) रोजी रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा , शुक्रवार (१५ एप्रिल) रोजी तुकाराम महाराज शास्त्री मुंडे परळीकर , शनिवार(१६ एप्रिल) रोजी भागवताचार्य केशव महाराज उखळीकर , रविवार(१७एप्रिल) रोजी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक , सोमवार (१८एप्रिल) रोजी भागवताचार्य बाळू महाराज गिरगांवकर , मंगळवार (१९ एप्रिल) रोजी चैतन्य महाराज देगलूरकर यांचे कीर्तन होईल . गुरुवार (२१ एप्रिल) रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान डॉ.नामदेव महाराज यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल.

संपुर्ण सप्ताह कार्यक्रमाचे 'झी टॉकीज' कडुन लाईव्ह प्रसारण केले जाणार आहे.या सप्ताहास भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिंगोरी ग्रामस्थांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu