Ad Code

'शिवा' संघटनेची बोधेगाव कार्यकारिणी जाहीर : शहराध्यक्ष पदी तागडे,उपाध्यक्षपदी गिरी तर सचिव पदी ॲड.कमाने यांची निवड


'शिवा' संघटनेची बोधेगाव कार्यकारिणी जाहीर
शहराध्यक्ष पदी तागडे,उपाध्यक्षपदी गिरी तर सचिव पदी ॲड.कमाने यांची निवड
शेवगांव  :  अखिल भारतीय वीरशैव युवक संघटने (शिवा) च्या बोधेगाव शाखेची कार्यकारिणी जिल्हाध्यक्षांच्या परवानगीने जाहीर करण्यात आली असुन त्यानुसार बोधेगाव शहराध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते दिपक तागडे,उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिरी तर सचिवपदी ॲड.कार्तिक कमाने यांची निवड करण्यात आली.
अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना (शिवा) च्या बोधेगाव येथील शाखेचे नुकतेच संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे यांचे उपस्थितीत उदघाटन करण्यात आले होते.शाखेची कार्यकारिणी निवड करणेकामी संघटनेच्या कार्यकर्त्यांची येथील ग्रामदैवत बोधेश्वर मंदिरात बैठक घेण्यात आली.
त्यांमध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शेटे यांचे सुचनेवरून दीपक तागडे यांची शहराध्यक्षपदी,ज्ञानेश्वर गिरी यांची उपाध्यक्षपदी,ॲड.कार्तिक कमाने यांची सचिवपदी,वैभव तोडकरी यांची युवा अध्यक्षपदी,सुनिल बोराटे व रवींद्र कळसणे यांची खजिनदार पदी तर नागेश डोंगरे यांची युवा खजिनदार पदी निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह सर्वश्री देविदास हुंडेकरी,संजय कानडे,मयुर हुंडेकरी,सुभाष सांबरे,सदाशिव शेटे,माऊली शेटे,सदाशिव तोरडमल,नागेश डोंगरे,रवींद्र तोडकरी,भीमा तोडकरी,राजेंद्र राळेगणकर,संतोष सोनेकर,कुशाबा पलाटे,रवींद्र कळसणे,सचिन हुंडेकरी,विजय कानडे,राजेंद्र कानडे,अभय हुंडेकरी,महेश भांगरे,शिवहारी तोडकरी,अमोल कमाने,श्रीनिवास मांदळे,वैभव तोडकरी,दादा मांदळे,बंडु कानडे आदीसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या प्रलंबित प्रश्नांची शासनदरबारी पाठपुरावा करून समाजाच्या सुख-दुःखात कायम साथ देऊ असा मनोदय नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
निवड झालेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu