Ad Code

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

अहमदनगर  :  वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक,कलात्मक,समाज संघटनात्मक,आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना देण्यात येणाऱ्या ‘महात्मा बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कार' साठी २० एप्रिल २०२२ पर्यंत समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

वीरशैव लिंगायत समाजातील समाजसेवक,कलावंत,समाज संघटनात्मक कार्यकर्ते,अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावुन पुढे यावेत यासाठी व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण २ पुरस्कार देण्यात येणार आहेत.पुरस्कारासाठी पात्रतेची नियमावली ८ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आली आहे.

२०१८-१९  ,  २०१९-२० , २०२०-२१ आणि २०२१-२२ या चार वर्षांचे पुरस्कार प्रस्ताव एकत्रित घेण्यात येणार आहेत.इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या चार वर्षांसाठी चार वेगवेगळे अर्ज करावेत.अर्जासोबत नियमानुसार आवश्यक योग्य माहिती जोडावी असे आवाहन सहायक आयुक्त देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu