Ad Code

'घृष्णेश्वर अर्बन'च्या पुढाकाराने अखंड हरिनाम सप्ताहात नेत्ररोग तपासणी शिबीर : परिसरातील ३५० लोकांची तपासणी

शेवगाव : भजन,किर्तन,रामायण सारखे विविध धार्मिक कार्यक्रम असणारे अखंड हरिनाम सप्ताह गावोगावी सुरू आहेत. मात्र मौजे गोळेगाव (ता.शेवगाव) येथील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये बोधेगाव येथील 'घृष्णेश्वर अर्बन निधी' संस्थेच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.त्यात तब्बल साडे तीनशे लोकांची तपासणी या शिबिरात केली आहे.सप्ताहात आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेत्र तपासणी शिबिराची माहिती 'घृष्णेश्वर'चे संस्थापक प्रा.भगवान फुंदे यांचेकडून घेताना भगवानगडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री महाराज.

गोळेगाव मध्ये सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात सोमवार (ता.२५) रोजी बोधेगावच्या 'घृष्णेश्वर अर्बन मल्टीपर्पज निधी' व अहमदनगरच्या 'आनंदऋषीजी नेत्रालय' यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या मोफत नेत्ररोग चिकीत्सा शिबिरात गाव परिसरातील सुमारे साडे तीनशे रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
दीपप्रज्वलन करून नेत्र तपासणी शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेव शास्त्री महाराज,'केदारेश्वर देवस्थान'चे बाबागिरी महाराज,घृष्णेश्वर'च्या अध्यक्षा द्वारकाबाई फुंदे,उपाध्यक्षा मंगल ढाकणे, सरपंच विजय साळवेसह परिसरातील सर्व भक्तजन,ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.या शिबिराच्या यशस्वितेसाठी 'घृष्णेश्वर'चे संस्थापक भगवान फुंदे,सुरेश ढाकणे,विजय साळवे,संजय आंधळे,बाळासाहेब फुंदे,अर्जुन फुंदे,राजेंद्र डमाळे,बाबासाहेब फुंदे,भागवत राशीनकर,नेमिनाथ धोंगडे,शरद फुंदे,महादेव फुंदे,सुखदेव फुंदे,शंकर फुंदे,अमोल फुंदे,भागवत डमाळे,शेख मामु,संदीप साळवे,चांगदेव सानप,मोहन धोंगडे,किरण फुंदे,सुरेश फुंदे,गोपिनाथ धोंगडे,नवनाथ सानप,लक्ष्मण सानप यांचेसह हरीनाम सप्ताह समिती,ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu