Ad Code

बोधेगावमधील जिल्हा बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ; खंडित वीज पुरवठ्याने चोरटे पसार झाल्याने पंधरा लाख रुपये वाचले

शेवगाव  :  तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा बँकेचे एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड पळविण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न रात्री अयशस्वी झाला.विशेष म्हणजे गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या जिल्हा बँकेच्या येथील शाखेच्या आवारातीरील हे मशीन फोडण्याचे धाडस चोरट्यांनी काल (शुक्रवार) रात्री साडे आठ ते साडे नऊच्या दरम्यान केले.
लाल चोकोनात) एटीएम मशीन खोलीत प्रवेश करताच प्रथमतः चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तोडले.

          बोधेगाव येथे सेंट्रल बँक,जिल्हा बँक,वक्रांगी ,इंडिया व आणखी एक खासगी असे मिळून पाच एटीएम मशीन आहेत.पैकी जिल्हा बँकेच्या बोधेगाव शाखेच्या आवारातील एटीएममध्ये बसवलेल्या सीटीव्हीमध्ये घटनाक्रम कैद झालेनुसार शुक्रवारी रात्री साडे आठच्या सुमारास तोंड बांधलेल्या दोघां चोरट्यांनी पाठीवर छोटेखानी वेल्डिंग मशीनसह मुख्य प्रवेशद्वारातुन प्रवेश केला.उघड्या असलेल्या एटीएम खोलीत प्रवेश करून खोलीचे द्वार बंद करून प्रथमतः आतील कॅमेरे तोडून टाकले व बाहेरील बाजुला असलेल्या वीज मीटर मधुन थेट आकडा टाकुन वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.मात्र या दरम्यान वेल्डिंग मशीनचा अतिरिक्त वीजभार सहन न झाल्याने  वीजेचे मीटर जळाले.वीज पुरवठा खंडित झाल्याने चोरट्यांनी  काढता पाय घेतला.त्यांमुळे मशीनमधील १४ लाख ९५ हजार रुपयांची रक्कम सुरक्षित राहिली.यापूर्वी देखील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता.त्यासह इतर चोरीच्या घटनेचा अद्यापही तपास लागलेला नाही.बँकेचे सुरक्षारक्षक रंगनाथ वैद्य हे साडे नऊच्या सुमारास आले असता एटीएम खोलीमध्ये अंधार दिसला असता जवळ पाहणी केल्यानंतर चोरीचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले.
जिल्हा बँक शाखेचे वीजेचे मीटर चोरट्यांनी तोडून वेल्डिंग मशीन चालु केले.

दरम्यान,घटनेची माहिती समजताच जिल्हा बँकेचे शाखाधिकारी कल्याण कोल्हे,तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके,सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र बागुल,नेताजी मरकड यांनी भेट देऊन पाहणी केली.सायंकाळी शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu