Ad Code

शिवरायांचा जाज्वल्य इतिहास तरुणांनी आत्मसात करावा - अशोक महाराज ईलग

शेवगाव  :  छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिरे, देऊळे सुरक्षित राहिले.हा शिवरायांचा जाज्वल्य इतिहास तरुणांनी आपल्या जीवनात आत्मसात केला पाहिजे असे प्रतिपादन ह.भ.प अशोक महाराज ईलग(शास्त्री) यांनी येथे केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील मारुती वस्ती येथे रौप्यमहोत्सवी अअखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी काल्याच्या कीर्तनात ते बोलत होते. पुढे बोलताना ईलग शास्त्री म्हणाले की,कोरोना सारख्या विनाशक आजाराने आपल्याला जगायला शिकवत आरोग्याचे महत्व दाखवुन दिले.आपल्या आसपासची कित्येक माणसं क्षणार्धात अनंताच्या प्रवासाला निघुन गेली.अशा महाभयंकर संकटातुन भगवंताने आपणांस सुखरूप ठेवले.त्यांमुळे सर्वांनी ईश्वराचे चिंतन केले पाहिजे.ईश्वर चिंतनात फार मोठी ताकत आहे.चांगल्या मित्रांच्या संगतीत रहा,आपल्या आयुष्याला योग्य वळण मिळेल असा सल्ला शेवटी त्यांनी दिला.

यावेळी राजकीय,धार्मिक,शैक्षणिक,औद्योगिक,शेती क्षेत्रातील दिग्गजांनी यावेळी हजेरी लावली होती.गावातील तरुणांनी एकत्रित येत या सप्ताहाचे यशस्वी आयोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu