Ad Code

संभाषण कौशल्य काळाची गरज - प्रा.प्रमोद तांबे

शेवगाव  :  संभाषण कौशल्य म्हणजे आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला, श्रोत्यांना समजावुन सांगणे.अशा कौशल्याच्या बळावर कुठलीही व्यक्ती जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्धी मिळवू शकते वा प्रसंगी आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील सोडवु शकते.श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता देखील एकप्रकारचे संभाषण कौशल्य होते.त्यांमुळे विद्यार्थ्यांनी उत्तम संभाषण कौशल्य आत्मसात केले पाहिजे,ती एक काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा नाट्यकर्मी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा.प्रमोद तांबे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील आबासाहेब काकडे कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित 'सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट' कार्यक्रमाच्या समारोपात 'सुत्रसंचालन व संवाद कौशल्य' या विषयावर प्रा.तांबे बोलत होते.व्यासपीठावर यावेळी प्रा.प्रमोद तांबे,सदाशिव गुरव, प्रा. संदीप पालवे, प्रा. प्रकाश राजळे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.तांबे म्हणाले की, बाजारपेठेत संभाषण कौशल्य नसेल तर आपल्याला यश मिळणार नाही.किती,काय व कसे बोलावे हे एक कौशल्य आहे.तुमचे बोलणे चांगले असेल तर तुमचे वक्तृत्व चांगले होते.त्यांमुळे तुम्हांला नेतृत्व करण्याची संधी येते आणि व्यक्तिमत्व देखील सुधारते.एक करिअर म्हणुन देखील संभाषण कौशल्याचा विचार होऊ शकतो.प्रसारमाध्यमामध्ये काम करण्यासाठी सुद्धा चांगले संभाषण कौशल्य अंगी असावे लागते.याच कौशल्याच्या जीवावर माणसाला एक विशिष्ट उंची गाठता येते.भाषणासाठी विषयाचे ज्ञान,आत्मविश्वास,बोलण्याची पद्धती,आवाजातील चढ-उतार,उत्तम देहबोली,वेळेचे नियोजन,विनोदी शैली अशा अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत.विद्यार्थ्यांनी आपले संवाद कौशल्य,भाषण कौशल्य विकसित करून जीवनात यशस्वी व्हावे असे आवाहन प्रा.तांबे यांनी शेवटी केले.

प्रा. प्रकाश राजळे यांनी अध्यक्षीय भाषण केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.आरती भुसारी या विद्यार्थिनीने तर प्रा.हरिदास सांगळे यांनी आभार मानले.प्रास्ताविक प्रा. संदीप पालवे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu