Ad Code

'अहमदनगर जिल्हा पोस्टल सोसायटी'च्या व्हा.चेअरमनपदी ॲड. रामेश्वर ढाकणे : संचालक मंडळावर प्रथमच शेवगाव पाथर्डीला स्थान,परिसरातुन ॲड.ढाकणेंचे अभिनंदन

शेवगाव  :  शंभर वर्षाच्या जुन्या व महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या अहमदनगर जिल्हा पोस्टल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पोस्ट खात्यातील कर्मचाऱ्यांची कामधेनु म्हणून ओळख असलेल्या संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळावर उपाध्यक्ष म्हणुन बोधेगाव पोस्ट कार्यालयातील ॲड.रामेश्वर ढाकणे यांची बिनविरोध निवड झाली.

२०२२ ते २०२७ या कालावधीकरिता संचालक मंडळ नुकतीच बिनविरोध निवडणुक पार पडली.काल (मंगळवार) नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली सभा निवडणुक निर्णय अधिकारी मुटकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या सभेत उपाध्यक्ष (व्हाईस चेअरमन) पदासाठी ॲड. ढाकणे यांच्या नावाची सुचना सलीम शेख यांनी मांडली तर किशोर नेमाने यांनी अनुमोदन दिले.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा प्रशासनाकडुन करण्यात आली. सर्व सभासदांच्या सहकार्याने तरुण पिढीकडे नेतृत्व सोपवत सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून दिल्याचा सभासदांनी जल्लोष केला.शेवगाव - पाथर्डी भागातुन प्रथमच ॲड. ढाकणे यांना संधी मिळाल्याने परिसरातुन त्यांचे कौतुक होत आहे.
यावेळी नुतन अध्यक्ष निसारभाई शेख तसेच नवनियुक्त संचालक सर्वश्री प्रफुल्लकुमार काळे,प्रमोद कदम,महेश तामटे,किशोर नेमाने,सलीम शेख,सुनील कुलकर्णी,शिवाजी कांबळे,अर्चना दहिंडे,स्वप्ना चिलवर यांचेसह माजी चेअरमन दत्तात्रय जासूद,अनिल गांधी,अमित कोरडे,धनंजय दैठणकर,बळी जायभाय,दिलीप खरात,सचिन अस्वर,महेश सदाफुले उपस्थित होते.

भविष्यात सभासदांच्या विकासाच्या दृष्टीने वाटचाल करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊ असा मनोदय उपाध्यक्ष ॲड. ढाकणे यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu