बोधेगाव , ता.२४ : परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पहिलवानबाबा मंदिराचा तीनदिवशीय कलशारोहन समारंभास उद्यापासुन (बुधवार) सुरुवात होणार असल्याची माहिती एकनाथ महाराज घोरतळे यांनी दिली.
मंदिराच्या नव्याने उभारणीनंतर कलशारोहन कोरोनामुळे दीड वर्षापासुन हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता.या कलशारोहन समारंभास उद्यापासुन सुरुवात होणार असुन उद्या बुधवार (ता.२५)रोजी सकाळी ८ वाजता बोधेगाव गावातुन कलश मिरवणुक होईल. गुरुवार (ता.२६) रोजी मंदिरात पुजा , होम-हवन विधी व रात्री अशोक महाराज ईलग यांचे जाहीर हरिकीर्तन होईल. शुक्रवार (ता.२७) रोजी सकाळी ११ वाजता हिंगोलीच्या श्री खाकीदासबाबा मठ संस्थान ह.भ.प कौशल्यानंद महाराज (जहागिरदार) यांचे शुभहस्ते कलशारोहन होईल.त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.तरी या धार्मिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.
0 टिप्पण्या