Ad Code

अपयश पचविणे अवघड असतं,वेडं होतं माणुस...!तीनदा अपयश पचविलेल्या हिम्मतवान मुलाचा कर्तृत्ववान बापाकडुन सत्कार

आपल्या राजकीय व सामाजिक जीवनामुळे कुटुंब,मित्र व सोयरे - धायरे यांच्याकडे दुर्लक्ष झाले.प्रताप या माझ्या मुलानेही तीनदा पराभव पचवला आहे.पण तो संघर्ष करत आहे याचा अभिमान असल्याचे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी सांगत भरसभेत व्यासपीठावरच मुलगा प्रताप याचा पुष्पहार घालून सत्कार करत गळाभेट घेतली.मी माझ्या मुलाची प्रथमच गळाभेट घेत असल्याचे सांगताच ढाकणे परिवारासह जनमुदाय काही काळ हेलावून गेला.राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या समोरच हा प्रकार घडल्याने वातावरण काही वेळ स्तब्ध झाल्याचे पहावयास मिळाले.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात आज 'केदारेश्वर'च्या'च्या डिस्टीलरी इथेनाॅल प्रकल्पाचे भुमीपूजन आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर आधारित 'महाराष्ट्र विधान मंडळातील श्री.बबनराव ढाकणे' या संपादित ग्रंथाचे प्रकाशन झाले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ढाकणे बोलत होते.
यावेळी बोलताना बबनराव ढाकणे म्हणाले की, मी अनेकांचा मित्र राहिलो.राज्यभर फिरत राहिलो मात्र कुटुंबाकडे दुर्लक्ष केले.त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही.सोयऱ्या धायऱ्याकडे गेलो नाही.त्यांचाही माझ्याबद्दलचा राग आहे.मित्र,मुला-बाळांचा,नातवांचाही राग आहे.एवढं सगळं केलंय पण आम्ही कोण आहे.
प्रतापच्या जीवनात संघर्ष आला आहे.मात्र तो कंटाळला नाही.तीन वेळेस पराभव झाला.तुमची ताकद आहे तोवर तो लढणार आहे.त्यांना कधीही जवळ घेतलं नाही.पण आज तुमच्या समोर माझ्या मुलाचा सत्कार मी करणार आहे असे म्हणत बबनरावांनी मुलगा प्रताप याचा पुष्पहार घालुन गळाभेट घेतली.यावेळी उपस्थित वातावरण भावनिक बनले. अपयश पचविणे फार अवघड असतं.वेडं होतं माणुस. पण मी त्याला सांगु इच्छितो.सत्ता या महत्वाच्या नाहीत तर जनतेची सेवा महत्वाची आहे.म्हणुन जिद्दीने काम करत राहा असा मोलाचा सल्ला दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu