Ad Code

आधोडी सेवा संस्थेची निवडणुक बिनविरोध : प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सर्व १३ जागांवरील उमेदवार विजयी घोषित


शेवगाव  :  शेवगाव तालुक्यातील आधोडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणुक आज १३ पैकी १३ जागांवर प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या सर्वांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

हेही वाचा  -  व्यायामशाळा व क्रीडांगण विकासा (Gym and Playground Development) साठी मिळणार अनुदान : पात्र संस्थांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन

आधोडी विविध सहकारी संस्था पंचवार्षिक निवडणुक (सन २०२१-२२ ते २०२६-२७ ) जाहीर झाली असता काल (बुधवार) पर्यंत अर्ज सादर करण्याच्या मुदतीत सर्वसाधारण,इतर मागास प्रवर्ग,महिला, अनुसुचित जाती जमाती,भटक्या विमुक्त जाती अशा मतदारसंघातुन एकुण १३ उमेदवारांनीच फॉर्म भरले.आज सकाळी भरलेल्या फॉर्मची छाननी झाली असता सर्व फॉर्म वैध ठरले.त्यांमुळे आधोडी सेवा संस्थेची निवडणुक बिनविरोध जाहीर करण्यात आली.

हेही वाचा  -  जिल्हा परिषद,नगरपालिका निवडणुका दोन आठवड्यात जाहीर करा : सर्वोच्च न्यायालयाचे निवडणुक आयोगाला आदेश,राज्य सरकारला मोठा झटका

बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ - सर्वसाधारण जागेकरीता परमेश्वर प्रभाकर पोटभरे , राजाराम बापुराव पोटभरे , अप्पासाहेब दिगांबर पोटभरे , नवनाथ नाना तांबे , अशोक विश्वनाथ पोटभरे , संभाजी सुभाष पोटभरे , केशव सुभाष म्हस्के , रामभाऊ भागचंद पोटभरे हे आठ तर  अशोक राघु खंडागळे हे अनुसुचित जाती जमाती प्रवर्गातुन आणि सुमन काशिनाथ येवले , मनिषा नारायण पोटभरे यांची महिला प्रवर्गातुन तसेच बाळासाहेब बबन तांबे हे इतर मागास प्रवर्गातुन व नामदेव रामजी राठोड यांनी वि.ज/भ.ज/वि.मा.प्र वर्गातुन बिनविरोध निवड झाली आहे.


निवडणूक अधिकारी म्हणुन ए.एन लोखंडे यांनी कामकाज पाहिले.सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, 'केदारेश्वर'साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu