अहमदनगर : पुण्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने व्यायामशाळा विकास,क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदान दरवर्षी देण्यात येते.या अनुदानासाठी ३१ मे २०२२ पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण २०१२ नुसार राज्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन,प्रचार - प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने जिल्हा स्तरावर विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान वितरित करण्यात येते.व्यायामशाळा विकास व क्रीडांगण विकास अनुदानासाठी जिल्हयातील अनुदान प्राप्त शाळा,कनिष्ठ महाविदयालये,जिल्हा परिषद,आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभाग,अल्पसंख्यांक विभाग यांचे मार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा,आश्रमशाळा व वसतिगृह,शासकीय ग्रामीण रुग्णालय,शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र,शासकीय जिल्हा रुग्णालय,शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था,पोलीस कल्याण निधी / पोलीस विभाग,शासकीय कार्यालये,स्थानिक स्वराज्य संस्था ( ग्रामपंचायत,नगरपरिषद,नगरपंचायत,महानगरपालिका,कॅन्टोन्मेंट बोर्ड) आदि अनुदानाकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करू शकतात. तसेच युवक कल्याण अनुदानासाठी युवक,क्रीडा,महिला व सामाजिक क्षेत्रात काम करणा-या नोंदणीकृत मंडळांनी देखील प्रस्ताव सादर करावेत.
प्रस्ताव सादर करण्याकरिता अर्जाचे वितरण ९ मे ते २७ मे २०२२ या कालावधीत करण्यात येणार असुन परिपूर्ण प्रस्ताव ३१ मे २०२२ पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत.तरी जिल्हयातील उपरोक्त नमूद पात्र संस्था,शाळा,महाविदयालयांनी प्रस्ताव सादर करावे असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी बिले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
0 टिप्पण्या