Ad Code

बोधेगावच्या शिवाजी विद्यालयाचा बारावीचा ९९ टक्के निकाल

बोधेगाव  :  एच एस सी परीक्षा २०२२चा निकाल काल(बुधवार) जाहीर झाला.येथील शिवाजी विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा ९९.४०% तर कला शाखेचा ९८.३४ इतका निकाल लागला आहे.विज्ञान शाखेत ८२.०० टक्के गुण मिळवत भाग्यश्री राम घोरतळे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर सुदर्शन मनोहर सोनवणे याने ८१.३३ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक आणि स्नेहल राजेंद्र भाकरे हिने ७९.८३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे. कला शाखेचा एकूण निकाल ९८.३४ टक्के लागला असुन कोमल शंकर आघाव हिने ७८.६७ टक्के मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तर प्रियंका शंकर धाने हिने ७६.८३ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक,आकांक्षा अनिल रुपनर हिने ७६.५० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक,भारती सुरेश लादे हिने ७४.५0 टक्के गुण घेऊन चतुर्थ क्रमांक तर सुषमा सुभाष तहकीक व विद्या बाळासाहेब घुमरे यांनी संयुक्तपणे ७३.८३ टक्के गुण घेत पाचवे स्थान पटकावले आहे.विज्ञान शाखेतुन एकूण १६९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते.पैकी २७ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी,१२२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर १८ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.एक जण पास ग्रेड मध्ये उत्तीर्ण झाला आहे.कला शाखेतुन एकुण ११२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.पैकी सहा जणांनी विशेष श्रेणी, ५७ जणांनी प्रथम श्रेणी तर ४४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.तीन विद्यार्थी पास ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयात प्राचार्य दशरथ पवार यांचे हस्ते गुलाबपुष्प,पेन देऊन गौरव करण्यात आला.या वेळी विद्यालयाचे प्राचार्य पवार,ज्येष्ठ शिक्षक अशोक मोरे,अशोक पोटफोडे,पालक राम घोरतळे,मनोहर सोनवणे,शंकर धाने ,भीमराव पाटेकर यांचेसह शिक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा.अशोक पोटफोडे यांनी केले तर आभार प्रा.स्वाती ढोले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu