Ad Code

सोयाबीन बियाणे पेरणीबाबत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

अहमदनगर  :  खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केले असुन याबाबतचे परिपत्रक कृषी आयुक्तांनी प्रसिद्धीस दिले आहे.

शेतकऱ्यांनी स्वतःकडील उपलब्ध चांगले बियाणे वापरण्यापुर्वी 'बीजप्रक्रिया' करत ओल म्हणजे ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत सोयाबीनची पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पेरणीसाठी बियाणे प्रति हेक्टरी ७५ किलोऐवजी ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकण पद्धतीने किंवा प्लॅटरचा वापर करून पेरणी करावी.सोयाबीनची उगवणक्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीजप्रक्रिया करावी.रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावे व नंतर त्याची पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu