Ad Code

बारावी(HSC Result 2022) चा निकाल उद्या (बुधवार) जाहीर होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद,मुंबई,नागपूर, कोल्हापूर,नाशिक,अमरावती,कोकण व लातुर या नऊ विभागीय मंडळामार्फत सन २०२२ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर उद्या बुधवार,दिनांक ०८/०६/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशलमीडियाद्वारे जाहीर केले.दरम्यान,कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घरून ऑनलाईन शिक्षण घेतले मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीने दिली होती.या परीक्षेसाठी १४ लाख ८५ हजार १९१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.पैकी ८ लाख १७ हजार १८८ मुले तर ६ लाख ६८ हजार तीन मुली होत्या.
'महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि.८ जून २०२२ रोजी दु.१:००वा. ऑनलाईन जाहीर होईल,' असं फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये शिक्षणमंत्री गायकवाड यांनी म्हंटलं आहे.
गेले अनेक दिवस राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे या निकालाची डोळे लागले होते.पुढील पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश या निकालावर अवलंबून असल्याने या निकालाकडे विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष आहे.
विद्यार्थ्यांना आपला निकाल।पाहण्यासाठी मंडळाच्या www.mahresult.nic.in , msbshse.co.in किंवा hscresult.mkcl.org या संकेतस्थळावरील MSBSHSE १२ वी निकाल २०२२ ही लिंक ओपन करून त्यानंतर परीक्षेचा रोल नंबर व जन्मतारीख टाकून कॅप्चा टाकल्यावर निकाल जाहीर होईल.सदर ऑनलाईन निकालाची प्रिंट काढून घ्यावी.जेणेकरून पुढील प्रवेशप्रक्रियेला अडचण येणार नाही.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu