अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) : अहमदनगर जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्यात उद्या (१३ जुलै) रोजी होणारी आरक्षण सोडत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थगित करण्यात येत असल्याची माहिती अहमदनगरचे उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हा परिषद गटांची सोडत नवीन जिल्हाधिकारी कार्यालय व पंचायत समिती गणांची सोडत त्या - त्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयात उद्या बुधवार (१३ जूलै ) रोजी होणार होती. राज्य निवडणूक आयोगाने ५ जुलै २०२२ रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली.एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रशासनाने स्थगित केला असुन सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल असेही उपजिल्हाधिकारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.
0 टिप्पण्या