Ad Code

ई- श्रम योजेनेच्या लाभार्थ्यांसाठी 'जनशक्ती' वतीने शेवगावला स्वतंत्र कार्यालय सुरू : योजनेचा गरजूंनी फायदा घ्यावा - 'जनशक्ती'संस्थापक अॅड.डॉ.काकडे

शेवगाव  :  भारत सरकार मार्फत गरजू व कामगारांसाठी असलेल्या ई- श्रम योजना राबवली जात असुन गरज कामगारांना या योजनेचा लाभ देण्यासाठी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने शेवगाव येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.या योजनेचा तालुक्यातील गरीब, गरजू कामगारांनी फायदा घ्यावा असे आवाहन जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड.डॉ.शिवाजीराव काकडे यांनी केले.
आज दि.(२१) रोजी शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यालयात गरजू व कामगारांसाठी अल्प दरात ई-श्रम कार्ड काढून देणे व इतर मार्गदर्शन करून देण्यासाठी स्वतंत्र कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार अनिल साठे होते.यावेळी जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे,देवराव दारकुंडे,नवनाथ ढाकणे,जनशक्ती उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे,जनशक्ती युवा आघाडीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण पातकळ,अकबर शेख,वैभव पूरनाळे,जनशक्ती श्रमिक संघाचे अध्यक्ष प्रा.सखाराम घावटे,संचालक नवनाथ खेडकर,दुर्गाजी रसाळ,राजेंद्र लोणकर,मनोज घोंगडे,विनोद मोहिते,आबासाहेब काकडे,रघुनाथ सातपुते,पै.सतिश दसपुते,गोरख गव्हाणे,रामदास विखे,भागचंद कुंडकर,भारत भालेराव,राजेंद्र फलके,विश्वास ढाकणे,शिवाजी औटी,मारुती वाघ,भिवसेन केदार,ज्ञानेश्वर खराडे,ज्ञानेश्वर फसले यांच्यासह जनशक्तीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना अॅड.काकडे म्हणाले की,केंद्र सरकारने असंघटित काम करणाऱ्या मजुरांसाठी ई-श्रम कार्ड योजना आणली आहे.या योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.शासन अनेक योजना राबवते परंतु त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाहीत.समाजातील अशा सर्व घटकातील लोकांसाठी जनशक्ती काम करत आहे.त्यामुळे तालुक्यातील गरजू व कामगारांनी ई-श्रम कार्डची नोंदणी करण्यासाठी जनशक्तीच्या ई-श्रम केंद्राला भेट द्यावी व ई-श्रम योजनेतंर्गत मिळणाऱ्या लाभाचा फायदा घ्यावा असे आवाहन संस्थापक काकडे यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu