Ad Code

'कांबी हायस्कूल' मधील गरीब विद्यार्थ्यांना जि.प सदस्या काकडे तर्फे वह्यांचे वाटप

शेवगाव  :  लाडजळगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांच्यातर्फे कांबी हायस्कूल मधील गरीब-गरजू विद्यार्थ्यांना आज वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अकबर शेख,'जनशक्ती' कांबी शाखेचे अध्यक्ष बाळासाहेब नरके,उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के,प्राचार्य अरुण वावरे उपस्थित होते.
कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचा 'समाजातील गोरगरिब,दिन-दलित कष्टकरी जनतेला मदतीचा हात' देण्याचा विचार व वारसा विद्यमान अध्यक्ष डॉ.विद्याधर ऊर्फ शिवाजीराव काकडे व सौ.हर्षदाताई काकडे समर्थपणे चालवित आहेत.त्यांच्या या कार्याचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकांनी घ्यावा असे आवाहन नरके यांनी यावेळी बोलताना केले.अकबर शेख व मुख्याध्यापक वावरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सचिन शिंदे यांनी तर श्रीमती वत्सला जाधव यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu