Ad Code

हातगाव ते भोण्याई देवी (जुना बोरगाव रस्ता) चिखलात : रस्ता दुरुस्ती न झाल्यास मोठे जनआंदोलन - ॲड.काकडे

शेवगाव  :  मुंगी गटातील सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आजही जसेच्या तसेच आहेत.या गटाची हमी घेतलेल्यांन्नी विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याने हा गट विकासकामांपासून पुर्णतः वंचित राहिलेला आहे.त्यामुळे जनतेने आता कोणाला निवडून द्यायचे हे ठरवले पाहिजे असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.डॉ.शिवाजीराव काकडे यांनी केले.
आज(गुरुवार) मौजे हातगाव येथे 'जनशक्ती'च्या वतीने आयोजित केलेल्या जनशक्ती जनसंवाद यात्रा'निमित्ताने जनशक्ती विकास आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आस्मान पठाण होते.यावेळी जनशक्ती उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे,भाऊसाहेब सातपुते,अकबर शेख,पृथ्वीसिंह काकडे,शाखा अध्यक्ष दत्ता औटी,उपाध्यक्ष आस्मान अभंग,सचिव राजू सातपुते,दत्तात्रय कनगरे,फतरूभाई पठाण,बापू अभंग,सत्यनारायण जाधव,लक्ष्मण बर्गे,भाऊसाहेब बर्गे,बंडू अभंग,शिवनाथ अभंग,महादेव कदम,विजू मातंग,नारायण मातंग आदि उपस्थित होते.
ॲड.काकडे यांनी येथील भोन्याई मंदिर रस्ता म्हणजेच जुना बोरगाव रस्त्याची ग्रामस्थांच्या मागणीवरून पाहणी केली.या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून रस्त्याने चालणे देखील मुश्किल झाले आहे.येथील ६० ते ७० टक्के लोकांच्या अत्यंत सुपीक जमिनी याच रस्त्यालगत आहेत.या रस्त्याकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे.सदरचा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असून आजतागायत या रस्त्यावर कोणताही निधी पडलेला नाही.सदर रस्ता हा पूर्णपणे मातीचा आहे.त्यामुळे रस्त्यावर पाणी साचून संपूर्णपणे गाळ आलेला आहे.याच रस्त्यावर परिसरातील श्रद्धास्थान असलेले भोण्याई देवीचे मंदिर आहे.दुर्दैवाने देवीचे दर्शन घेण्यासाठी देखील आज लोकांना रस्ता राहिला नाही.त्यामुळे या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे असे न झाल्यास हातगाव परिसरातील सर्व शेतकरी संघटीत होऊन 'न भूतो..' असे मोठे आंदोलन करतील असा निर्णय एकमताने घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu