Ad Code

शेवगावात 'वंचित'ने सर्वप्रथम उमेदवारी जाहीर : बोधेगाव गणातुन 'महिला आघाडी'तालुकाध्यक्ष ढवळे निवडणुक लढविणार

शेवगाव  : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मोकळा झाल्यावर काल ( गुरुवार) जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट - गणांचे आरक्षण जाहीर झाले.आरक्षण जाहीर होताच इच्छुकांसह राजकीय पक्ष,विविध आघाड्यांच्या घडामोडींना वेग आला आहे.एकीकडे विविध पक्ष,आघाड्या आपापली व्युहरचना ठरविण्यात मश्गुल असतानाच वंचित बहुजन आघाडी या पक्षाने राज्यात सर्वप्रथम आपली उमेदवारी जाहीर करून धक्का दिला आहे. 'बोधेगाव पंचायत समिती गणा' तुन 'वंचित'च्या महिला आघाडीच्या शेवगाव तालुकाध्यक्षा संगीता ढवळे यांची उमेदवारी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर केली.

न्यायालयाच्या आदेशानुसार या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या संवर्गनिहाय आरक्षण सोडती काल ( गुरुवार) पार पडल्या. त्यानुसार पंचायत समितीसाठी बोधेगाव गण 'सर्वसाधारण महिले'साठी आरक्षित झाला आहे.या गणातुन संगिता ढवळे यांची उमेदवारी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.चव्हाण यांनी जाहीर केली आहे.ढवळे या बोधेगाव परिसरात गेली वीस वर्षे समाजकारणात सक्रीय असुन प्रगतीशिल शेतकरीही आहेत.अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करत संघर्षाचा त्यांचा आजवरचा प्रवास राहिला आहे.बचतगटाच्या माध्यमातुन त्यांनी अनेक महिलांचे संसार उभे करण्यास हातभार लावला असुन मोठं संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहे.विश्वासार्हतेच्या बळावर त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातही ब-यापैकी जम बसवलेला आहे.
स्वत:साठी सारेच जगतात मात्र थोडं समाजासाठीही जगायला हवं या भावनेतुन त्या अडल्या-नडलेल्या सावित्रीच्या लेकींच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात.आजमितीला त्या तीन मुस्लिम समाजातील वृध्द निराधार स्त्रियांचा सांभाळ करत आहेत. एका समाजसेविकेला उमेदवारी देऊन वंचितने समाजसेवेचा सन्मानच केल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu