शेवगाव : शहरातील निर्मलनगर परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असुन ग्रामस्थांना पायी चालणे देखील कठीण बनले आहे.या भागातील रस्त्यासह पाणी,वीज व बंदिस्त गटारी यांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापाला तोंड द्यावे लागत आहे.त्यांमुळे निर्मलनगर भागातील या सुविधांकडे नगर परिषदेने तातडीने लक्ष घालावे अन्यथा परिसरातील राहिवाशांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांच्या नेतृत्वाखाली निर्मलनगर येथील ग्रामस्थ व महिलांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांना येथे दिले.
निवेदनात म्हटल्या आहे की, निर्मलनगर हा शेवगाव नगर परिषद अंतर्गत भाग असुन या भागामध्ये साधारणपणे ५० ते ६० हून अधिक कुटुंब राहत असुन पाणी व मिळकत कर देखील नियमितपणे भरत आहेत. असे असुन देखील नगरपरीषदे मार्फत या भागातील नागरिकांना रस्ता,पाणी व वीज आदि कोणत्याही पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत.येथील भागातील अंतर्गत रस्ते खुप खराब व निसरडे झालेले असुन रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत.या भागात शाळा असल्याने विद्यार्थ्यांना या खड्ड्यातूनच वाट काढत शाळेत यावे लागत आहे.दर १० ते १५ दिवसाला पिण्याचे पाणी येत असल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत.पर्यायाने पाण्यासाठी खाजगी टँकरवर भरमसाठ खर्च करावा लागतो.येथील विजेचे पोलवर लाईट लावलेले नसल्याने या भागात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.त्यांमुळे येथील नागरिकांना उपरोक्त सुविधा लवकरात लवकर पुरवाव्यात अन्यथा निर्मलनगरमधील सर्व रहिवाशी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला.प्रतिभा उबाळे,ज्योती सुरवसे,जयश्री नागरे,संगीता डेंगळे,विद्या जाधव,शिला पायघन,शारदा कोळेकर,कांता हरवणे,विद्या जाधव,मंगल धट,विद्या शेंडगे,शिला चव्हाण,सुनंदा शिंपी,सायरा बागवान,ऐश्वर्या शहाणे,अॅड.बाबासाहेब लांडगे,किशोर जायभाये,वसंत सुरवसे,नरहरी शहाणे आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या