Ad Code

'पीएम किसान (pm kisan) योजनेत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन 'केवायसी' करण्याचे जिल्हा समन्वयक अधिकाऱ्यांचे आवाहन

अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) : 'पीएम किसान' योजनेचा लाभ घेत असलेल्या परंतु अद्याप 'केवायसी' (ग्राहकाची ओळख) न केलेल्या शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२२ पर्यंत 'केवायसी' ऑनलाईन करून घ्यावी अन्यथा 'केवायसी' अभावी या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते असा स्पष्ट इशारा देत 'केवायसी' करून घेण्याचे 'पीएम किसान' योजनेचे अहमदनगर जिल्हा समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्याची ऑनलाईन'केवायसी' करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम 'मे २०२२' पर्यंत राबविण्यात आली.या मोहीमेस ३१ जुलै २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.मात्र अद्यापही जिल्ह्यातील  ४१.११ टक्के लाभार्थ्याची 'केवायसी' प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in  या संकेतस्थळावरील फॉर्मर कॉर्नर (Farmer Corner) या टॅब मध्ये किंवा 'पीएम किसान' अँपमध्ये ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वतः केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.'ग्राहक सेवा केंद्रा'वर १५ रूपयांचे शुल्क भरून 'केवायसी' बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल अशी माहिती श्री.निचित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu