Ad Code

बालमटाकळी - कांबी रस्ता दुरुस्त करा अन्यथा १७ ऑगस्टला शेवगाव - गेवराई महामार्गावर 'शाळा भरो आंदोलन' करणार - जि.प सदस्या काकडे यांचा इशारा

अमोल निकम / शेवगाव  : तालुक्यातील बालमटाकळी ते कांबी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असुन या रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा अन्यथा येथील ग्रामस्थ,विद्यार्थी व शेतकरी बुधवार(ता.१७) रोजी सकाळी ०९:३० वाजता बालम टाकळी येथील शेवगाव-गेवराई महामार्गावर 'शाळा भरो आंदोलन' व 'एकेरी रस्ता बंद आंदोलन' करतील असा इशारा जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदा काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मौजे बालमटाकळी व कांबी भागातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आशिष येरेकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हंटल्याप्रमाणे , शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी ते कांबी रस्त्यालगत गावतील बहुसंख्य लोकांच्या शेतजमिनी तसेच वस्त्या असून हा प्रमुख दळणवळणाचा रस्ता आहे.या रस्त्यावर सुमारे १५० कुटुंबाची लोकवस्ती आहे.बालमटाकळी पासून सुमारे ३ कि.मी. पर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण झालेले आहे.परंतु त्यानंतर पुढील ६ कि.मी.चा रस्ता अस्तित्वात राहिलेला नाही.या रस्त्यावर गुडघाभर खोलीचे तर काही ठिकाणी कमरे एवढ्या खोलीचे खड्डे तयार झालेले आहेत.गेल्या दोन वर्षापासून या परिसरात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यावरील कमरेएवढ्या गाळ असलेल्या खड्ड्याच्या रस्त्यातून शाळकरी मुलांना जीवघेणा प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे तर कधी जास्तीच्या पावसामुळे रस्त्याअभावी शाळा बुडवावी लागत असल्याचे वास्तव आज. परिणामी त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते.या रस्त्याबाबत शासनाचे व राज्यकर्त्याचे संपूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. 
एखादी व्यक्ती जर आजारी पडली तरी रस्त्याअभावी त्याच्यावर कुठलाही वैद्यकीय उपचार करता येत नाही.रस्त्याअभावी शेतीची कामे वा शेतात जाणे-येणे दुरापास्त झाले असून शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी,शेतीची अवजारे व खतांची ने-आण  करण्यासाठी कोणत्याही साधनांचा वापर करता येत नाही.अशा दयनीय परिस्थितीत बऱ्याचदा शासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष्य वेधून देखील दुर्लक्ष झालेले आहे.याबाबत महिनाभरापुर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना साकडे घालुन रस्ता दुरुस्त करण्याबाबत विनंती केली होती मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही.त्यांमुळे येत्या काही दिवसात या रस्त्याचा विषय मार्गी न लागल्यास येथील ग्रामस्थ बुधवार (दि.१७ ऑगस्ट) रोजी सकाळी ०९:३० वाजता शेवगाव-गेवराई या महामार्गावर बालमटाकळी येथे 'शाळा भरो आंदोलन व 'एकेरी रस्ता बंद आंदोलन' करणार असल्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu