Ad Code

स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्‍त विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण : नगरच्या रेसिडेन्शियल महाविद्यालयात चित्रदालनाचे उद्घाटन

अहमदनगर  (जिमाका वृत्तसेवा)  :  स्‍वातंत्र्याच्या अमृत महोत्‍सवानिमित्‍त केंद्र शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार १३ ते १५ ऑगस्‍ट २०२२ या कालावधीत संपूर्ण राज्‍यासह जिल्‍ह्यात 'घरोघरी तिरंगा' हा उपक्रम व ९ ते १७ ऑगस्‍ट दरम्‍यान स्‍वराज्‍य महोत्‍सव मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यात येत आहे.यानिमित्‍ताने आज (बुधवार) येथील न्‍यु,आर्टस,कॉमर्स अॅण्‍ड सायन्‍स कॉलेजमध्ये जिल्‍ह्यातील विविध शाळांमधील शालेय विद्यार्थ्‍यांनी विविध सांस्‍कृतिक कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाला  मराठी टि.व्‍ही.मालिकेचे कलाकार मोहीनीराज गटणे,सुप्रसिध्‍द चित्रकार तथा शिल्‍पकार प्रमोद कांबळे,जिल्‍हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) अशोक कडूस,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्‍कर पाटील,अहमदनगर जिल्‍हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्‍थेचे अध्‍यक्ष नंदकुमार झावरे,संस्‍थेचे उपाध्‍यक्ष रामचंद्र दरे,रेसिडेन्शियल महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार पोकळे आदी मान्‍यवर उपस्थि‍त होते.
यावेळी शहरातील विविध शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी देशभक्‍तीपर समुहगीते,समुहनृत्‍य,नाटीका या सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.तत्‍पूर्वी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते रेसिडेन्शियल हायस्‍कुल येथे स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सव या संकल्‍पनेवर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले.या चित्रप्रदर्शनात शहरातील विविध शाळेच्‍या विद्यार्थ्‍यांनी स्‍वतः तयार केलेल्‍या निवडक २०० चित्रांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी विस्‍तार अधिकारी सुरेश ढवळे यांनी परिश्रम घेतले.सुत्रसंचाल डॉ.अमोल बागुल यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu