Ad Code

कोविड काळानंतर प्रथमच भरणार 'काशी केदारेश्वर' यात्रा

शेवगाव  :  तालुक्यातील मौजे नागलवाडी येथील ग्रामदैवत तसेच परिसरातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थानामध्ये श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते.कोविड काळामध्ये सलग तीन वर्षे शासनाकडून यात्रेवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यंदा कोविड परिस्थिती आटोक्यात आली असल्याने शासनाने यात्रा व सण उत्सव यांवरील निर्बंध शिथिल केल्याने यावर्षी ही यात्रा भरणार असल्याचा आनंद परिसरातील ग्रामस्थांमध्ये आहे.

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन असलेले हे देवस्थान गोळेगाव पासून तीन कि.मी. अंतरावर निसर्गरम्य परिसरात आहे.या ठिकाणी महादेवाची स्वयंभू पिंड आहे.रामायण काळात प्रभू श्रीराम व सीता माता या ठिकाणी काही काळ वास्तव्याला होते अशी अख्यायिका आहे.शेवगाव तालुक्यासह शेजारील गेवराई,पैठण, शिरूर कासार,पाथर्डी तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून हे देवस्थान ओळखले जाते.श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येथे येत असतात.मात्र तिसऱ्या श्रावण सोमवारी ठिकाणी मोठी यात्रा भरत असून मोठ्या प्रमाणात परिसरातील भाविक भक्त येथे हजेरी लावतात.कोविड काळात बंद असलेली ही यात्रा यावर्षी मोठया उत्साहाने भरणार असल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती ह.भ.प.बाबागिरी महाराज यांनी दिली आहे.

दरम्यान, तालुक्याच्या पूर्व भागातील दुर्लक्षित व उपेक्षित असलेल्या या केदारेश्वर देवस्थानचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत ‘क’ वर्गात समावेश करून घेतला असुन भाविकांच्या सोयीसाठी भक्तनिवास इमारतीचे काम पूर्ण झाल्याने देवस्थान विकासात मोठी भर पडली आहे.येणाऱ्या भाविकांची यामुळे मोठी सोय होणार असल्याचे लाडजळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.हर्षदा काकडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu