शेवगाव (अमोल निकम) : बालमटाकळी ते कांबी रस्त्यासाठी आज अनोखे आंदोलन पहावयास मिळाले. जनशक्तीच्या जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन थेट शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर ‘एकेरी वाहतुक बंद व महामार्गावर शाळा भरो' आंदोलनच उभारले.या अनोख्या पद्धतीने केलेल्या आंदोलनाच्या धसक्याने प्रशासनाने या रस्त्याच्या तात्पुरत्या दुरुस्तीकरिता सात लाख तर मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याकरिता तब्बल ७५ लाख रुपयांचे अंदाजपत्रकच वरिष्ठांच्या मंजुरीसाठी पाठविल्याचे आणि त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे वरिष्ठांचे आश्वासन मिळताच हे अनोखे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान,कित्येक वर्षापासुन रस्त्याअभावी मोठ्या यातना सहन करणाऱ्या स्थानिकांच्या प्रश्नांवर आजतागायत कायमस्वरूपी तोडगा का निघाला नाही.?प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे याकडे का दुर्लक्ष झाले? या प्रश्नांनी उपस्थितांत चर्चेला उधाण आले होते. बालमटाकळी ते कांबी रस्त्यावर सुमारे १५० हून अधिक कुटुंब वास्तव्य करतात.परंतु त्यांना वस्तीवर जाणे-येण्यासाठी रस्त्याअभावी प्रचंड हाल सोसावे लागत असुन पावसाळ्यात तर हा रस्ता प्रचंड चिखल - पाण्याने व्यापलेला असतो.या त्रासाला कंटाळूनच काही मुलांनी शाळा सोडल्या तर काही शेतकऱ्यांना आपली शेती पडीक ठेवावी लागत असल्याची विदारक स्थिती समोर आली.रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अबाल वृद्धांना दवाखान्यात सुद्धा जाता येत नसल्याचे दाहक वास्तव आहे. यांमुळे या रस्त्याचे काम त्वरित करावे या मागणीसाठी आज (बुधवार) सकाळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे व अॅड.विद्याधर काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव-गेवराई महामार्गावर बालमटाकळी येथे 'महामार्गावर शाळा भरो' व 'एकेरी रस्ता बंद' आंदोलन करण्यात आले.यावेळी जगन्नाथ गावडे,राजेंद्र पातकळ,संजय आंधळे,अशोकराव ढाकणे,लक्ष्मण पातकळ,गुलाबराव दसपुते,हरिभाऊ फाटे,माणिक गर्जे,अकबरभाई शेख,विजय लेंडाळ,राहुल लेंडाळ,विठ्ठल सौंदर,संतोष गंगाधर,गणेश गाडे,विक्रम गरड,सर्जेराव घोरपडे,मनोहर बामदळे,मनोज घोंगडे,नवनाथ खेडकर,बाळासाहेब नरके,रासपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव लेंडाळ,बाबासाहेब मस्के,पोपट बागडे,विश्वास लेंडाळ,जगन्नाथ लेंडाळ,गंगा गरड,दुर्गाजी रसाळ,भाऊसाहेब राजळे,सविता लेंडाळ,सुवर्णा लेंडाळ,रेणुका बागडे,अंजली लेंडाळ,नीता लेंडाळ,जयश्री सौंदर,अलका काळे,सिंधु गंगाधर,रेश्मा पठाण यांच्यासह लेंडाळ वस्तीवरील सर्व पुरुष,महिला,शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी दोन ते अडीच तास रस्त्यावर शाळा भरून शाळकरी मुलांनी शिक्षण घेतले व शासनाचे लक्ष वेधले.
यावेळी बोलतांना जि. प सदस्या काकडे म्हणाल्या की,'जनशक्ती' ही संघटना गेली २०-२५ वर्षापासून गोरगरिबांच्या प्रश्नासाठी झगडत आहे.लोकप्रतिनिधींनी पूर्व भागाकडे विकासाबाबत सततच दुजाभाव केलेला दिसतो.यांना निवडणुकीत येथील नागरिकांची मते चालतात मग त्यांना रस्ते,पाणी,वीज कोणी द्यायची? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.यापुढे येथील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी 'जनशक्ती' तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असेल असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी लहान चिमुकल्या विद्यार्थीनी सोनाली घनवट,गायत्री बागडे,वृषाली सौंदर आदींनी रस्त्यासाठी गाणी गायली तर इयत्ता कु.सोनाली घनवट हिने अत्यंत पोट तिडकीने रडत रडत रस्त्याच्या प्रश्नामुळे आमच्या वस्तीवरील कुटुंबांचे झालेले हाल यावेळी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
यावेळी अॅड. काकडे,जगन्नाथ गावडे,विजय लेंडाळ,भाऊसाहेब सातपुते,माणिक गर्जे,हरिभाऊ फाटे,कारभारी मरकड आदींची भाषणे झाली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
0 टिप्पण्या