Ad Code

बालमटाकळीच्या दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांचा 'वंचित'मध्ये प्रवेश : गावा-गावातील घराणेशाही मोडीत काढून सामान्यांच्या हाती सत्ता देण्याचे प्रा.चव्हाणांचे आवाहन

शेवगाव  :  तालुक्यातील प्रस्थापित घराणेशाहींनी गावा-गावात  घराणेशाही पोसली आहे.वर्षानुवर्षे तेच तेच सत्तेत असल्याने दबावाचे वातावरण आहे.हेच प्रस्थापित बगलबच्चे सर्वसामान्य गोरगरिबांचे शोषण करतात.त्यांमुळे भविष्य काळात  मतदारांनी अशी घराणेशाही मोडीत काढून सर्वसामान्य तरुणांच्या हाती सत्ता सोपवावी,असे  आवाहन 'वंचित'चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी केले.
बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील हनुमान मंदिरात वंचितच्या वतीने आयोजित 'घोंगडी बैठकी'त प्रा.चव्हाण बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक नेते सुभाषमामा वैद्य होते.याप्रसंगी संजय उगले,प्यारेलालभाई शेख,शाहूराव खंडागळे,बन्नूभाई शेख,मुन्वरभाई शेख,कमुभाई शेख उपस्थित होते.या वेळी बालमटाकळी ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोष घोरपड़े,प्रदिप पटवेकर यांचेसह रफिक शेख,दिलीप भोंगळे,राजू इंगावले,अफसर शेख आदींनी वंचित बहूजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शाहूराव खंडागळे यांनी केले तर सर्व उपस्थितीतांचे आभार संतोष घोरपडे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu