शेवगाव : तालुक्यातील मंगरूळ खुर्द येथील निर्मलाताई काकडे माध्यमिक आश्रमशाळेत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पाचवीचा सेमी इंग्रजी माध्यमाचा वर्ग सुरु करण्याच्या अनेक दिवसांपासुनची इच्छा संस्थेने विशेष प्रयत्न करून पुर्ण केली असुन पालक मेळाव्याचे औचित्य साधून ॲड.संजयराव काकडे यांचे हस्ते आज सेमी इंग्रजी वर्गाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी इयत्ता पाचवीतील नवीन विद्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आश्रमशाळेचे समन्वयक अनिल जगताप यांचेही मनोगत झाले.
मुख्याध्यापक प्रभाकर उबाळे यांनी आश्रमशाळेच्या स्थापनेपासुन ते आजपर्यंतच्य शैक्षणिक विकासाचा आढावा घेतला.यावेळी अजिनाथ झिरपे,डॉ.गमे,बाळासाहेब शिंगाडे,गणेश वाघमारे,सदाशिव बटुळे आदीसह पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गणेश उदमले यांनी तर आभार सुरेश पवार यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या