Ad Code

तरुणांना दिशा देण्याचे 'जनशक्ती'चे काम - जिल्हा परिषद सदस्या काकडे

शेवगाव  :  शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात उतरवण्याची धमक तरुणांमध्ये आहे.फक्त त्यांना योग्य दिशा व विचार देण्याची गरज आहे आणि हेच काम जनशक्ती विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता सध्या तालुक्यामध्ये करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे केले.
आज (गुरुवार) रोजी अहमदनगरस्थित जिल्हा उद्योग केंद्रामार्फत वसंतराव नाईक महामंडळाच्या वतीने तालुक्यातील ३२ युवकांचे प्रकरण करून त्यांना १ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान मिळण्यासाठी जनशक्तीने पाठपुरावा केला.या युवकांचे प्रकरण मंजूर झाले असून जनशक्तीच्या वतीने त्यांना मंजुरीचे पत्र वाटपाच्या आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड.शिवाजीराव काकडे,उपाध्यक्ष राजेंद्र पातकळ,उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे,जनशक्ती मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष आबासाहेब काकडे,युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष माणिकराव गर्जे,भाऊसाहेब सातपुते,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संतोष गायकवाड,अकबर भाई शेख,भागवत भोसले,ज्ञानेश्वर शेटे,हरिश्चंद्र फाटे,दुर्गाजी रसाळ,मनोज घोंगडे,पै.सतिश दसपुते आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना जि. प सदस्या काकडे म्हणाल्या की,सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम देणे हा जनशक्तीचा अजेंडा आहे.तालुक्यातील राजकीय पक्ष युवकांचा वापर फक्त निवडणूकीपुरताच करतात.त्यांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी कोणीही घेत नाही.आम्ही  ती जबाबदारी घेतली आहे.आम्ही दिलेल्या वचनानुसार तालुक्यातील ३२ युवकांचे वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत प्रकरणे मंजूर करून आणले असून त्यांना त्याअंतर्गत तब्बल १ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान या महामंडळांतर्गत दिले जाणार आहे मात्र युवकांनी घेतलेल्या या योजनेचा लाभ योग्य ठिकाणीच करावा असा उपदेश त्यांनी दिला.
जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे साहेब यांनी युवकांना दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.संजय मरकड यांनी कष्ट घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu