Ad Code

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या(शुक्रवार) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर

अहमदनगर ( जि मा का वृत्तसेवा ) : राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या (शुक्रवार) अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असुन त्यांचा अधिकृत दौरा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.तो पुढीलप्रमाणे असेल - 

शुक्रवार दिनांक ९ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता शासकीय विश्रामगृह, अहमदनगर येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण.सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जनावरांना झालेल्या लंपी चर्म रोगाबाबत पशुसंवर्धन विभागातील अहमदनगर जिल्हयाची आढावा बैठक,स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.दुपारी १२:३० वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.दुपारी १:३० वाजता शासकीय विश्रामगृह येथून लोणी,ता. राहाताकडे प्रयाण.दुपारी २:३० वाजता लोणी येथे आगमन व राखीव.सायंकाळी ०४:३० लोणी बु. एक गाव एक गणपती गणेशोत्सव मंडळ बक्षिस वितरण,स्थळ- श्रीराम मंदिरासमोर, लोणी बु. व  लोणी येथील निवासस्थानी मुक्काम.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu