Ad Code

'दहावी ग्रुप २००७-०८' ने पेटवली 'दिनदुबळ्यां'च्या कुटुंबात दिपावलीची 'पणती' : बोधेगावमधील गरजवंत कुटुंबांना किराणा किटचे केले वाटप

शेवगाव : दिवाळी म्हणजे दिव्यांचा झगमगाट,फराळाचा आस्वाद अन् फटाक्यांची आतिषबाजी हे नेहमी दिसणारे चित्र असले तरी काही कुटुंबे आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे या आनंदापासुन दुर असतात.तिथे दिवाळी सण असो अथवा इतर कुठलाही सण म्हणजे अशा आनंदापासुन एकप्रकारे अनेक कोस दूरचे अंतर.या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा,त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी बोधेगाव येथील श्री शिवाजी विद्यालयातील २००७-०८ या शैक्षणिक वर्षातील तत्कालीन इयत्ता दहावीचे विद्यार्थी सरसावले आहेत. त्यांनी गावातील गरजवंतांना किराणा किट चे वाटप केले आहे.यासाठी त्यांनी हजारो रुपयांची वर्गणी जमा केली.त्यामुळे या गरजवंत कुटुंबियांची दिवाळी आनंदमय बनली आहे.अशा या दिनदुबळ्यांच्या जीवनात एकप्रकारे दिपावलीची 'पणती' पेटवण्याचे काम करणाऱ्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातुन कौतुक होत आहे.

बोधेगाव मधील श्री शिवाजी विद्यालयामधील २००७-०८ या शैक्षणिक वर्षामध्ये तत्कालीन काळात इयत्ता दहावीच्या बॅच मधील युवकांनी यंदाच्या दिवाळीला गावातील निराधार,गरीब,एकल महिला यांना थेट किराणा वाटप करून दिवाळी साजरी करण्याचे ठरविले.

त्यासाठी प्रतीक घनवट,निलेश फुंदे,जनार्धन नाईक,महेश पांडव,किशोर खोले,अमोल बांगर,प्रल्हाद पानखडे,संतोष खिळे,शेखर बापते,महेश शिंदे,पंकज घुमरे,अभिजित ढवळे,सुजित सोलापुरे,अनिस सय्यद आदी मित्रांसह एकूण २५ जणांनी एकत्रित येत गावातील विविध गल्लीतील आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणारे,निराधार,एकल वृद्ध,अपंग अशा गरजवंतांच्या घरात दिवाळी साजरी झाली पाहिजे,त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे या हेतूने या युवकांनी किराणा किट तयार केली.त्यामध्ये साखर,रवा,तेल,हरभरा डाळ,मैदा,पोहे,चिवडा,मुरमुरे,तिखट,मीठ, साबण,उटणे,चहा पावडर,खोबरे,हळद,मसाला,टुथपेस्ट,फरसाण,मिठाई आणि पणत्या आदी साहित्याचा समावेश केला.त्यासाठी त्यांनी हजारो रुपयांची वर्गणी केली.

त्यानंतर आज सकाळ पासुन गावातील घोरतळे गल्ली,तेली गल्ली,खिळे गल्ली,ढवळे गल्ली,आंबेडकर नगर,धनगर गल्ली,झोपडपट्टी या भागातील वस्त्यांमधील साठ जणांना या साहित्याचे वितरण केले.त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातुन कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Close Menu