Ad Code

गटातील पाणी प्रश्न न सोडविल्याने विकास झाला तो फक्त कागदावरच का ? : हर्षदा काकडेंचा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा घुलेंना जाहीर सवाल

शेवगाव  :  दहिगाव ने गटातील महत्त्वाचा पाणी प्रश्न तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांना सोडवता आला नाही तर मग गटात विकास कामे झाली कोणती ? विकास झाला तो फक्त कागदावरच का ? असा जाहीर सवाल 'जनशक्ती'च्या माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांनी जि. प च्या माजी अध्यक्ष राजश्री घुले यांना नाव न घेता विचारला.
आज मंगळवार रोजी जनशक्ती विकास आघाडी व जनशक्ती श्रमिक संघाच्या ढोरसडे येथील शाखा उदघाटन करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष आबासाहेब राऊत,महासचिव जगन्नाथ गावडे,उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब राजळे,भाऊसाहेब सातपुते,राजेंद्र फलके,मनोज घोंगडे,कारभारी मरकड,भागचंद कुंडकर,वसंत वाघ,गोविंद कावळे,सूर्यकांत गवळी,विशाल गवारे,सुनील गवळी,ज्ञानेश्वर मगर,शिवाजी आजबे,निवृत्ती खंबरे,अमोल गाडे,दीपक ठोंबरे,प्रकाश कुलकर्णी,रामकिसन तासतोडे,सतीश माळवदे,रमेश माळवदे,संदीप ठोंबळ,विठ्ठल माळवदे,सोमनाथ बुचडे,सुनील वखरे,शेषराव आपशेटे,संतोष राऊत,सोपान भाऊसाहेब खंबरे,मथुराबाई खिल्लारे,मनीषा मगर,हौसा खंबरे,शांता बुचडे,मंगल गाढे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाकच्या अध्यक्षस्थानी सखाहरी तोगे होते.
पुढे बोलताना जि. प सदस्य काकडे म्हणाल्या की,गेल्या २५ वर्षापासून विविध गटातुन नेतृत्व करताना आम्ही निवडून आलेल्या गटातच नव्हे तर गटाच्या गटाबाहेरही विकासकामे केली.परंतु जि.प.अध्यक्षांना त्यांच्या स्वतःच्या गटातच न्याय देता आला नाही.येथील परिस्थिती 'धरण उशाला आणि कोरड घशाला' अशी आहे ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे.त्यामुळे येथील नागरिकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करा व आपला विचार बदला.कोणाच्याही दबावाला बळी पडू नका.येथील कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यावर भर द्या असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी संजय शेळके,नागराज गिरम,भाऊसाहेब गडाख,राजेंद्र गादे,कानिफनाथ कावले,कचरू खंडागळे,संजय पवार,अशोक कोल्हे यांनी जनशक्तीत प्रवेश केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मगर यांनी तर आभार सोमनाथ बुचडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu