Ad Code

कांबी हायस्कूलमध्ये 'सुजान पालकत्वाच्या दिशेने' व्याख्यानमालेचे आयोजन

शेवगाव : आधुनिक धावत्या युगात पाल्यांच्या शिक्षणाच्या वाटा बदलल्या आहेत.परंतु ही पिढी संस्कार मूल्यांपासून दूर जाता कामा नये यासाठी माता पालकांनी वेळ देऊन आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार करावेत असा मौलिक सल्ला प्रसिद्ध अभिनेते,नाट्य कलावंत,लेखक प्रा.उमेश घेवरीकर यांनी दिला.
आज शनिवार रोजी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या ४४ व्या पुण्यस्मरणानिमित्त कांबी हायस्कूल,कांबी येथे खास माता पालकांसाठी 'सुजान पालकत्वाच्या दिशेने' व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे होत्या.यावेळी लक्ष्मण पातकळ,अकबर शेख,आसाराम कर्डिले,बाबासाहेब नरके,बाजीराव लेंडाळ,मैनाताई वाघमारे,बाबासाहेब म्हस्के,इसाक शेख,भागवत कुऱ्हे,नारायण मडके आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना घेवरीकर म्हणाले की,आधुनिक धावत्या युगात पाल्यांच्या शिक्षणाच्या वाटाही बदलल्या आहेत.त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाबरोबर त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे.मात्र हे करताना त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका.त्यांच्याशी मैत्री रूपाने संवाद साधा.त्यांना प्रश्न विचारू द्या.त्यांची उत्तरे त्यांना शोधायला भाग पाडा तसेच सकारात्मक राहून मानसिक आधार द्या.वाढदिवसांवर खर्च करण्याऐवजी त्याच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करा.
माजी जि. प सदस्य काकडे म्हणाल्या की,व्याख्यानाला माता पालकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहून आबासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरल्याची जाणीव होते.आबासाहेबांनी गोरगरीब कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या.म्हणूनच आज ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा दारोदारी पोहोचली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर गरड यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक अरुण वावरे यांनी तर आभार संस्था समन्वयक सचिन शिंदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu