Ad Code

निवृत्तीवेतन धारकांनी बँकामध्ये हयातीचे दाखले सादर करण्याचे जिल्हा कोषगार अधिकाऱ्यांचे आवाहन

अहमदनगर, १ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी नोव्हेंबर २०२२ च्या निवृत्तीवेतनासाठी हयातीचा दाखला बँकामध्ये देणे बंधनकारक आहे.त्यांमुळे निवृत्तीवेतन धारकांनी बँकांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी भाग्यश्री जाधव-भोसले यांनी केले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत सर्व निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्तीवेतन धारकांच्या याद्या संबधित बँकांकडे हस्तांतरीत करणेत आलेल्या आहेत. शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी  निवृत्तीवेतन घेत असलेल्या बँकेमध्ये जाऊन हयातीचे प्रमाणपत्र सादर करणेसाठी यादीमधील आपले नावासमोर स्वाक्षरी करावी. बँकेमध्ये जाताना आपले आधारकार्ड, पॅनकार्ड सोबत घेऊन जावे असे आवाहनही श्रीमती जाधव-भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu