Ad Code

प्रतीक जगदाळेंचे यश अभिमानास्पद : ॲड.शिवाजीराव काकडे

शेवगाव : कठीण परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि अत्यंत गरीबीतुन प्रतीक जगदाळेंनी मिळवलेले यश हे संस्थेच्या व तालुक्याच्या साठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांनी शेवगाव येथे केले.
आज बुधवार रोजी आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाच्या शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिक जगदाळे याने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशपुर्व परिक्षा असलेल्या 'नीट २०२२'  मध्ये ५६२ गुण मिळवल्याने त्याची गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाली.त्यांमुळे संस्थेच्या वतीने प्रतिक यांस गौरविण्यात आले.त्यावेळी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी शैक्षणिक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मणराव बिटाळ,विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते,हरिभाऊ जगदाळे,जनशक्ती उद्योग आघाडीचे अध्यक्ष अशोकराव ढाकणे,अनिल मगर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना ॲड.काकडे म्हणाले की,
मोठ्या चिकटीसह कष्ट,परिश्रम आणि मनाच्या एकाग्रतेच्या जीवावर यशाच्या उच्च शिखर गाठता येते.याचे उत्तम उदाहरण प्रतीक जगदाळे आहेत. त्याने बारावी मध्ये विज्ञान शाखेत ८२.५०% गुण मिळवत दहिगाव केंद्रात प्रथम येण्याचा मानही पटकावला होता.त्यांचे ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण शहरटाकळी विद्यालयात झाले.गरिबीवर मात करत त्यांनी हे यश मिळवल्याने त्यांच्या यशाचा धडा आजच्या तरुण पिढीने घेण्याचे आवाहन करत शुभेच्छा दिल्या.यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समुह व जनशक्ती परिवाराकडून प्रतिक जगदाळे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu