Ad Code

'टाटा'चे ७३९ वाण 'बाजरीचा राजा' : एकरी २२ क्विंटल इतके उत्पन्न, मंगरूळ मध्ये मार्गदर्शन मेळावा संपन्न

शेवगाव : सर्व रोगावर प्रतिकारक्षमता आणि खरीप व रब्बी या दोन्ही हंगामासाठी टाटा ग्रुपचे '७३९' हे बाजरीचे वाण उत्तम असुन अधिक उत्पन्न देणारे आहे असे मत कंपनीचे विक्री विभाग व्यवस्थापक माणिक देशमुख यांनी व्यक्त केले.
 शेवगाव तालुक्यातील मंगरूळ येथे बाजरीच्या '७३९' वा णाच्या कृषीतुन समृद्धीकडे या ब्रीदवाक्याने मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी विक्री विकास व्यवस्थापक सुशील कडू,माजी सरपंच बाळासाहेब विघ्ने, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन एकनाथ कसाळ, भागचंद पठाडे उपस्थित होते. दाट पेरणी ऐवजी पातळ अथवा टोकन पद्धतीने सुद्धा बाजरीचे भरपूर उत्पन्न घेऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले.
या वाणाचे मोठे कणीस,जास्त उत्पन्न,चव चांगले,दाण्याचा गावरान रंग, लवचिक ताट असल्याने ताटाच्या पुर्ण वाढीनंतर दमदारपणा,जास्त होऊन जनावरांना चारा भरपूर मिळत असल्याचा अनुभव उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितला.
याप्रसंगी मंगरूळ येथील बाळासाहेब विघ्ने,नितीन विघ्ने,संतोष केदार,बाळासाहेब केदार,वाडगाव येथील आजिनाथ खेडकर,बाळासाहेब पाथरकर,हसनापूर येथील संभाजी ढाकणे,कोळगाव येथील ब्रह्मदेव झिरपे,राक्षी येथील विष्णू मडके या जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी परिसरातील सुमारे पाचशे शेतकऱ्यांसह कंपनीचे अधिकारी, कृषी विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu