Ad Code

'मराठी पत्रकार परिषदे'ची नगर दक्षिणच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर : जिल्हाध्यक्ष नेटकेंनी केल्या निवडी जाहीर,शासकीय योजनांच्या लाभासाठी प्रयत्नशील राहण्याचा मनोदय

अहमदनगर  : राज्यातील पत्रकारांच्या हितासाठी सर्वप्रथम स्थापन झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या नगर जिल्हा (दक्षिण) पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.परिषदेच्या वरिष्ठांच्या मान्यतेने नगर जिल्हाध्यक्ष (दक्षिण) सूर्यकांत नेटके यांनी या निवडी केल्या आहेत.

पत्रकारांच्या हितासाठी सर्वप्रथम स्थापन झालेल्या आणि सुमारे ८५ वर्षाचा इतिहास असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा विस्तार होत आहे.पत्रकार म्हणून काम करत असलेल्या प्रतिनिधीला शासनाचे अधिस्विकृती (अॅक्रिडेशन) पत्रिकेसह शासनाच्या अन्य योजनांचा लाभ मिळावा यासाठी परिषद कायम आग्रही असून पाठपुरावा सुरु आहे.
नगर जिल्ह्याचा विस्तार पाहता दक्षिण व उत्तर असे दोन भाग करत नवीन पदाधिकारी नियुक्त केले आहे.नव्याने करण्यात आलेल्या कार्यकारिणीत अनेक मान्यवर पत्रकारांना सोबत घेतले आहे.परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख,विश्वस्त किरण नाईक,परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे,राज्य सचिव मन्सूर शेख,नाशिक विभागीय अध्यक्ष रोहिदास हाके,राज्य संपर्कप्रमुख अनिल महाजन यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नवीन पदाधिकारी निवडीला मान्यता देत अभिनंदन केल्याचे जिल्हाध्यक्ष नेटके यांनी सांगितले.
नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांत जिल्हा उपाध्यक्ष -  अमोल गव्हाणे (दै.पुढारी,श्रीगोंदा) व अनिल साठे (दै.लोकमत,शेवगाव), जिल्हा सरचिटणीस -  महादेव दळे (संपादक,दै.वीरभूमी), जिल्हा सह-सरचीटणीस - अशोक निमोणकर (दै.लोकमत,जामखेड), कायदेशीर सल्लागार -  अॅड.शिवाजी(अण्णा) कराऴे (अ.नगर), प्रदेश प्रतिनिधी - रमेश चौधरी (दै.पुढारी,शेवगाव),  जिल्हा संपर्कप्रमुख - देवीदास आबुज (सा.पारनेर दर्शन,पारनेर),प्रसिद्धी प्रमुख - रामेश्वर तांबे (दै.दिव्य मराठी,बोधेगाव, ता.शेवगाव) व वाजीद शेख (अ.नगर), कोषाध्यक्ष अमर छत्तीशे(श्रीगोंदा), जिल्हा कार्यकारीणी सदस्य - मच्छिंद्र अनारसे (दै.अजिंक्य भारत,कर्जत),कैलास बुधवंत (दै.पुण्यनगरी,शेवगाव),शरद शिंदे (दै.लोकमत,आढळगाव ता. श्रीगोंदा),समीर दाणी (उपसंपादक,दै.पुण्यनगरी,अ.नगर),डाॅ.सूर्यकांत वरकड (उपसंपादक,दै.पुढारी,अ.नगर),रावसाहेब मरकड (दै.दिव्यमराठी,शेवगाव),दत्ता उकिरडे (दै.सकाळ,राशीन, ता. कर्जत),केशव चेमटे (अजिंक्य भारत,भाळवणी ता. पारनेर),विलास मुखेकर (दै.लोकआवाज,करंजी ता. पाथर्डी),भाऊसाहेब काळोखे (उपसंपादक,दै. लोकआवाज,अ.नगर) यांची नियुक्ती केली आहे.नगरमधील सर्व दैनिकांचे संपादक परिषदेचे मार्गदर्शक व सल्लागार असतील.लवकरच नगर दक्षिण व उत्तर जिल्ह्यातील पदाधिकारी,सभासद पत्रकारांसाठी मागदर्शन कार्यशाळा व मेळावा घेतला जाणार असल्याचे परिषदेकडुन सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu