Ad Code

दहावी-बारावीच्या परिक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्यातील 'हे' १६ केंद्र संवेदनशील जाहीर : कॉपीसाठी मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा


अहमदनगर : राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दहावी व बारावी परीक्षा 'कॉपीमुक्त' घेण्यात येणार असुन विद्यार्थ्यांना कॉपीसाठी सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
आज शनिवार(ता.१८) रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(माध्यमिक) अशोक कडूस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी त्याची प्रवेशद्वारावरच झडती घेण्यात येणार असुन परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निर्धारित वेळेनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती देत जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, दहावी-बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे.या परिक्षेसाठी जिल्ह्यातील १६ केंद्र  'संवेदनशील' जाहीर केले असुन त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे.येत्या २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची तर २ ते  २५ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा होणार असुन जिल्ह्यात बारावीसाठी १०८ आणि दहावीसाठी १७९ केंद्र आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.
कॉपीमुक्त अभियानाकरिता सहा जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असुन प्रत्येक तालुकानिहाय तहसीलदारांचे देखील भरारी पथक राहणार आहे.महसुल, पोलिस व शिक्षण विभाग संयुक्तरित्या कॉपीमुक्त अभियानावर काम करणार आहे.
दहावी व बारावी परीक्षेसाठी अहमदनगर जिल्ह्यात एकूण १६ संवेदनशील असल्याचे जाहीर करण्यात आले असुन त्यात सर्वाधिक सहा केंद्र पाथर्डी तालुक्यात आहेत.तसेच अहमदनगर शहर - ३ ,शेवगावमध्ये -३ व जामखेड,नेवासे,कोपरगाव,श्रीगोंदे येथे प्रत्येकी एक असे एकूण १६ केंद्र 'संवेदनशील' असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस यांनी दिली.

'संवेदनशील परीक्षा केंद्र' 

१)राजे छत्रपती शिवाजी विद्यालय,कोरडगाव,ता.पाथर्डी,

२)संत भगवानबाबा कला,विज्ञान व वाणिज्य विद्यालय, खरवंडी कासार,ता.पाथर्डी,

३)रेणुका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोहटे,ता.पाथर्डी,

४)संत भगवानबाबा उच्च माध्यमिक विद्यालय, तनपुरवाडी,ता.पाथर्डी,

५)श्री आनंद जैन उच्च माध्यमिक विद्यालय,चिंचोडी शिराळ, ता.पाथर्डी,

६)एम.एम निऱ्हाळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाथर्डी,

७)संत भगवानबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,गोळेगाव,ता.शेवगाव,

८)कै. विमलबाई गंगाधर गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गायकवाड जळगाव,ता.शेवगाव,

९)श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोधेगाव, ता.शेवगाव,

१०)सेंट सेव्हिअर्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज,अहमदनगर शहर,

११)दादासाहेब रुपवते माध्यमिक व उच्च विद्यालय, अहमदनगर शहर,

१२)श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गांधीनगर,अहमदनगर शहर,

१३)खर्डा इंग्लिश स्कुल,खर्डा,ता.जामखेड

१४)घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोडेगाव,ता.नेवासा,

१५)श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कोळपेवाडी,ता..कोपरगाव,

१६)के.पी जाधव हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज,चिंभळे, ता.श्रीगोंदा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu