Ad Code

कांबी ते पिंप्रीराजा पायी पालखी सोहळ्यास सुरुवात

नरहरी शहाणे / अमरापुर : शेवगाव तालुक्यातील कांबी येथील सद्गगुरू विश्वासनंद महाराज संस्थान पालखी सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.
कांबी येथील ग्रामदैवत श्री सद्गगुरू विश्वासनंद महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असुन श्रींच्या पालखीचे रविवार (ता.१९) रोजी कांबी येथून प्रस्थान झाले आहे. पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम नांदर होणार असुन रात्री कृष्णा महाराज कुऱ्हे यांचे हरिकीर्तन व पंचक्रोशीतील भजनी मंडळींचा जागर होईल.सोमवार(ता.२०) रोजी दुपारी खादगाव(ता. पैठण) येथे ह. भ. प. गणेश महाराज गाडे यांचे प्रवचन होईल व रात्री ह. भ. प.अशोक महाराज भारती यांचे हरिकीर्तन व त्यानंतर सोहळ्यातील अडुळ ग्रामस्थांचा भजनाचा कार्यक्रम होईल. शुक्रवार(ता.२४) रोजी कार्यक्रमांची सांगता होईल.
या पालखी सोहळ्यासाठी कांबी व पंचक्रोशीतील भाविक विशेषतः महिला,युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu