शेवगाव : तालुक्यातील नजीक बाभूळगाव येथील गंगामाई साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पास सायंकाळी साडे सहाच्या सुमारास भीषण आग लागली असुन आता पर्यंत इथेनॉलच्या चार टाक्यांचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांकडुन मिळत आहे.दरम्यान,आगीत जीवितहानी झाली वा नाही अथवा याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
इथेनॉल या पेट्रोकेमिकल सदृश रसायनाने पेट घेतला असुन आगीने रौद्ररूप धारण केले असुन यांत जखमी झालेल्यांचा आकडा पन्नासपेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जीवितहानी बाबत अद्याप काही ही माहिती समोर आलेली नाही.इथेनॉल मुळे येथील आग आटोक्यात येण्याऐवजी मोठ्या प्रमाणात भडकत असल्याचे समजते.
दरम्यान, कारखाना घटनास्थळ परिसरातुन स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रशासनाकडुन देण्यात आले असुन नागरिकांनी देखील याबाबत खबरदारीने दूर जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कारखाना परिसरातील कामगार,रहिवाशी यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.मात्र अचानक घडलेल्या या गंभीर घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या